बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017 (16:59 IST)

अभिनेता राम कपूर विरोधात फसवणुकीचा गुन्हा

मुंबईतील कोर्टात अभिनेता राम कपूर विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 35 लाखांच्या कर्जाची परतफेड करण्यास असमर्थ ठरल्याने रामविरोधात गेल्या महिन्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

कुलाब्यातील ‘मावी बिझनेस वेंचर्स एलएलपी’ या कंपनीकडून रामने ऑगस्ट 2016 मध्ये कर्ज घेतलं होतं. महिन्याभरात 24 टक्के दराने ही रक्कम तो फेडणार होता. मात्र ठरल्याप्रमाणे वर्षभरानंतरही 35 लाखांची रक्कम परत फेडू न शकल्यामुळे राम कपूरविरोधात तक्रार नोंदवण्यात आली.

अप्रामाणिक हेतूने रामने फसवणूक केल्याचा दावा कंपनीने केला आहे. अमेरिकन एक्स्प्रेस क्रेडिट कार्डाची थकबाकी भरण्यासाठी रामने तातडीने पैसे उसने घेतल्याचं ‘मावी बिझनेस वेंचर्स एलएलपी’ने सांगितले आहे.