बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

शुभांगी लाटकर जंक्शन वाराणसी सिनेमाच्या चित्रिकरणामध्ये व्यस्त

हिंदी सिनेसृष्टीतला छोटा तसेच मोठा पडदा आपल्या अभिनयाने गाजवणाऱ्या शुभांगी लाटकर वाराणसी जंक्शन या हिंदी सिनेमात झळकणार आहेत. अनेक हिंदी तसेच मराठी मालिकांमध्ये आपण शुभांगी लाटकर यांचा अभिनय पहिला आहे. आशिकी -२ ,फोर्स २,  जॉली एल.एल.बी २, बी ए पास २ या नुकत्याच रिलीज झालेल्या सिनेमात त्यांनी काम केले आहे. सध्या त्या धीरज पंडित दिग्दर्शित आगामी "वाराणसी जंक्शन" या सिनेमाच्या शूटमध्ये बिझी आहेत. 
आर्या एंटरटेनमेंट या बॅनरतर्फे या सिनेमाची निर्मिती केली जात आहे. या सिनेमात शुभांगी यांच्यासोबतच अंजन श्रीवास्तव, झरीना वहाब, देव शर्मा, गोविंद नामदेव, अनुपम श्याम, सुब्रतो दत्ता हे कालाकार पाहायला मिळणार आहेत. कमलेश सिंग हे या सिनेमाचे निर्माते असून सुशांत शंकर हे संगीतदिग्दर्शक आहेत.