मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 5 ऑक्टोबर 2017 (09:38 IST)

अशा आहेत मिशेल ओबामा यांच्या शुभेच्छा

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा या जोडप्याने नुकतीच आपल्या सहजीवनाची २५ वर्षे पूर्ण केली.  वाढदिवसानिमित्त मिशेल यांनी आपला जुना फोटो शेअर केला आहे. ‘ लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आणखी काही वर्षांनंतरदेखील तू माझा चांगला मित्र राहशील. मी ओळखत असलेलं तू सर्वगुणसंपन्न व्यक्तीमत्त्व आहे ‘ असं लिहित मिशेल यांनी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

३ ऑक्टोबर १९९२ मध्ये हे दोघंही विवाहबंधनात अडकले. मिशेल यांनी हार्वर्ड लॉ स्कुलमधून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. १९८८ मध्ये सिडली ऑस्टिन लॉ फर्ममध्ये त्या नोकरी करू लागल्या आणि तिथेच त्यांची भेट बराक ओबामा यांच्याशी झाली. मिशेलना त्यांची मेंटोर म्हणून नेमण्यात आले. मिशेलच्या व्यक्तिमत्त्वाने बराक प्रभावित झाले होते आणि त्यांनंतर त्यांनी ‘डेट’साठी विचारले. पुढे याचे प्रेमात रुपांतर झाले.

ओबामांच्या प्रवासात मिशेल यांचा वाटा मोलाचा होता.