Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जगापुढे शांतता आणि सुरक्षेचे मोठे आव्हान : मोदी

Updated: बुधवार, 24 जानेवारी 2018 (11:24 IST)
 
भारताचे तत्कालीन पंतप्रधान देवेगौडा हे 1997 मध्ये दावोसला आले होते. तेव्हा भारताचा जीडीपी हा सुमारे 4 मिलियन डॉलरच्या आसपास होता. दोन दशकानंतर तो आता सुमारे सहापट अधिक आहे. आता आपण नेटवर्क सोसायटी नाही. तर बिग डेटाच्या विश्वात वावरत आहोत. 1997 मध्ये युरो चलन नव्हते. त्यावेळी ब्रेक्झिटची चिन्हेही नव्हती. त्यावेळी खूप कमी लोकांनी ओसामा बिन लादेनचे नाव आणि हॅरी पॉटरचे नाव ऐकले होते. त्यावेळी बुद्धिबळ खेळणार्‍या खेळाडूंना कॉम्प्युटरबरोबर पराभूत होण्याचा धोका नव्हता. त्यावेळी गुगलचा शोधही लागला नव्हता. त्यावेळी जर तुम्ही अ‍ॅमेझॉनचे नाव इंटरनेटवर शोधले असते तर तुम्हाला नदी किंवा पक्षचे नाव सापडले असते. ट्विट करण्याचे का पक्षीच करत असत. 
 
दावोस त्यावेळी इतर सर्वांपेक्षाही पुढे होते आणि आजही आहे. आज आपल्याकडे डेटा खूप आहे. डेटाचा पर्वत बनत आहे. त्यावर नियंत्रणाची स्पर्धा लागली आहे. आता म्हटले जाते की, जो डेटावर नियंत्रण ठेवेल तोच जगात आपले वर्चस्व कायम राखेल. आज वेगाने बदलत जाणारे तंत्रज्ञान आणि त्यामुळे निर्माण होणारे आव्हान अधिक गंभीर होताना दिसत आहे.
 
यावेळी त्यांनी लोकशाहीबद्दलही भाष्य केले. ते म्हणाले, आम्ही भारतीय आपल्या लोकशाही आणि विविधतेवर अभिमान बाळगतो. धार्मिक, सांस्कृतिक, विविध भाषा आणि विविध प्रकारच्या समाजासाठी लोकशाही केवळ एक राजकीय व्यवस्था नाही तर एक जीवनशैली असल्याचे ते म्हणाले. 70 वर्षांच्या स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच देशात एकीकृत कर व्यवस्था लागू करण्यात आली. पारदर्शकता आणि जबाबदारी निश्‍चित करण्यासाठी आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

महिला हॉकी विश्वचषकात भारतीय संघाने चीनसोबत २-२ ने सामना बरोबरीत सोडवला

अशोकधाम मंदिरात विजेचा धक्का बसल्याच्या अफवेमुळे चेंगराचेंगरीत ७ भाविकांचा मृत्यू

हवामान विभागाने २२ ऑगस्टपर्यंत पावसासाठी यलो अलर्ट जारी केला

LIVE: हवामान विभागाने २२ ऑगस्टपर्यंत पावसासाठी यलो अलर्ट जारी केला

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील १२४ नवीन आरोग्य सुविधांचे ऑनलाइन उद्घाटन केले

पुढील लेख
Show comments