बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 22 जानेवारी 2018 (08:59 IST)

अण्णा हजारे यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करत मोदींना पंतप्रधानपदाचा प्रचंड गर्व असल्याची टीका केली. ‘आतापर्यंत मी ३० हून अधिक पत्रे पाठवली. मात्र, पंतप्रधान मोदींनी यातील एकाही पत्राचे उत्तर दिले नाही,’ असे अण्णा म्हणाले. आटपाडी येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. २३ मार्चपासून अण्णा दिल्लीत आंदोलन सुरू करत आहेत. आंदोलनाला जनतेचा पाठिंबा मिळवण्यासाठी जागोजागी जाहीर सभा घेणार आहेत. या वेळी होत असलेले आंदोलन सर्वात मोठे असेल. हा केंद्र सरकारला इशाराच असेल, असा दावाही अण्णांनी केला. लोकपाल आणि लोकायुक्तांची तातडीने नेमणूक करा, शेतकऱ्यांना ५ हजार रुपये पेन्शन द्या आणि शेतीमालास चांगली आधारभूत किंमत जाहीर करा, अशा अण्णांच्या मागण्या आहेत.