बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 15 जानेवारी 2018 (12:53 IST)

मोदींच्या गळाभेटीची काँग्रेसने उडवली खिल्ली

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू भारत दौर्‍यावर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रॉटोकॉल तोडून विमानतळावर त्यांची गळाभेट घेत जंगी स्वागत केले. मोदींच्या याच गळाभेटीची काँग्रेसने ट्विट करीत खिल्ली उडवली.
 
काँग्रेसने पक्षाच्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ ट्विट केला असून यात मोदींच्या गळाभेटीची चांगलीच खिल्ली उडवली आहे. या व्हिडिओत पंतप्रधान मोदींच्या गळाभेटीवर 'कुछ ज्यादा' असे म्हणत मोदींचा जुना व्हिडिओ दाखवला आहे. पंतप्रधान मोदी जुन्या व्हिडिओत विविध राष्ट्राध्यांची गळाभेट घेत आहेत. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आणि त्यांची पत्नी यांची भेट, र्जर्मनीच्या चान्सलर अँजेला र्केल यांच्या सोबतची बैठक, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची गळाभेट, तुर्कीचे राष्ट्रपती तैय्यप एर्दोगन, फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रांस्वा ओलाद यांची गळाभेट घेताना मोदी दिसत आहेत.