1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 31 जानेवारी 2018 (12:23 IST)

अबुधाबीतील मंदिराचे मोदी करणार उद्‌घाटन

narendra modi
अबुधाबीतील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. 9 ते 12 फेब्रुवारीदरम्यान मोदी पॅलेस्टाइन, यूएई आणि ओमनच्या दौर्‍यावर जाणार आहेत. त्यावेळी ते मंदिराच्या उद्‌घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. 2015 मध्ये मोदींच्या दौर्‍यावेळी यूएई सरकारने अबुधाबीत मंदिरासाठी जमीन देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर सरकारने अल-वाथबा परिसरात मंदिर बांधण्यासाठी 20 हजार चौरस फूट जमीन दिली होती. खासगी देणग्यांच्या मध्यमातून हे मंदिर उभारले जाणार आहे.