बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 25 सप्टेंबर 2018 (16:57 IST)

संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत नवा इतिहास

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा आर्डेन यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीत आपल्या चिमुकलीसह उपस्थिती लावली. संयुक्त राष्ट्राच्या इतिहासातही बैठकीला पहिल्यांदाच एका लहान मुलानं उपस्थिती लावली आहे म्हणूनच या मायलेकींनी नवा इतिहास रचला आहे. यापूर्वी कोणत्याही देशाच्या महिला पंतप्रधानानं आपल्या बाळासह बैठकीला उपस्थिती लावली नव्हती.
 
नेल्सन मंडेला शांतता परिषदेमध्ये जसिंडा आर्डेन यांनी भाषण दिलं. सोमवारी ३ महिन्यांची मुलगी निव्ही ती अरोहा हिला घेऊन त्यांनी बैठकीसाठी उपस्थिती लावली. जसिंडा या पंतप्रधान पदावर असताना आई झालेल्या जगातल्या दुसऱ्या महिला पंतप्रधान आहेत. याआधी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी असताना बेनझीर भुत्तो यांनी मुलीला जन्म दिला होता. जसिंडा आर्डेन ३७ वर्षांच्या आहेत त्यांच्याबद्दल सांगायचं तर त्या आतापर्यंतच्या न्यूझीलंडच्या सर्वात तरुण पंतप्रधान आहेत. जोडीदार क्लार्क गेफोर्ड मुलीची काळजी घेण्यासाठी त्यांच्या सोबत होते. या जोडप्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.