शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 24 ऑक्टोबर 2016 (16:55 IST)

पाकचा हल्ला आठ वर्षाचा मुलगा ठार

पाकिस्तानने  पुन्हा  शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकने केलेल्या या भ्याड हल्ल्यात   एक आठवर्षाचा मुलगा ठार झाला आहे. जम्मू-काश्मिरच्या कानाचाक सेक्टरमध्ये पाकिस्तानी रेंजर्सनी केलेल्या गोळीबारात  आठवर्षांचा मुलगा ठार झाला आणि चार जण जखमी झाले आहे.  
 
पाकिस्तानच्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला. रविवारी रात्री उशिरा  जम्मूच्या आरएसपूरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी रेंजर्सनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला आहे. त्यामुळे भारतीय सैन्य संतापले असून लवकरच हल्ला होईल असे चिन्हे दिसत आहे.