शुक्रवार, 10 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 29 जानेवारी 2023 (13:29 IST)

Pakistan : बलुचिस्तानमध्ये बस अपघातात 39 ठार

39 killed in a bus accident in Balochistan
पाकिस्तानातील लासबेला येथे एक मोठी दुर्घटना घडली. येथे प्रवाशांनी भरलेली वेगाने धावणारी बस खोल कालव्यात कोसळली. या अपघातात 39 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की बस कालव्यात पडताच पेट घेतला. बस कराचीहून क्वेट्टाला जात होती. 
 
बसमध्ये 48जण होते. अपघातानंतर लगेचच बचावकार्य सुरू करण्यात आले असून सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्याचबरोबर जखमींना जवळच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रविवारी रात्री उशिरा ही दुर्घटना घडल्याने बचाव कार्यात बचावकर्त्यांना खूप अडचणी आल्या आणि अंधारामुळे पोलिसांना अडचणींचा सामना करावा लागला. 
 
Edited By - Priya Dixit