गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: रविवार, 29 जानेवारी 2023 (13:10 IST)

जोधपूरच्या 3 फुटाचा नवरा 3 फुटांची नवरीचे आगळे वेगळे लग्न

असे म्हणतात की लग्नगाठ स्वर्गातच जुळते.उंची कमी असलेल्या जोधपूरच्या साक्षी आणि राजसमंदच्या ऋषभने हे सिद्ध केले आहे.दोघांची उंची सुमारे 3 फूट 7 इंच आहे. साक्षी बीकॉम आणि एमबीए केल्यानंतर दहावीच्या मुलांची शिकवणी घेत आहे. तर ऋषभ स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे 
 
26 जानेवारीला राजस्थानमधील जोधपूरमध्ये दोघांचे लग्न झाले. लग्नादरम्यान जोडप्यासाठी एक हलणारा मंच तयार करण्यात आला होता. यावर दोघांनी एकमेकांना माळ घातली. यादरम्यान लोकांनी विवाह सोहळ्याला हजेरी लावत दोघांना आशीर्वाद दिले. 
 
या अनोख्या लग्नाबाबत साक्षीचा भावाने दिव्य सोनीने सांगितले की, साक्षी आणि ऋषभ यांचा साखरपुडा गेल्या वर्षी झाला होता. त्या नंतर ते दोघे एकमेकांना  भेटले तेव्हा काहीतरी नवीन आणि वेगळं करावे  असा विचार त्यांच्या मनात आला. यावर सोशल मीडियावर मिनी कपल नावाचा आयडी तयार करून फोटो शेअर करण्यास सुरुवात केली.  
 
सोशल मीडियावर ही जोडी लोकांना खूप आवडल्याचे सांगितले. लग्नातही या जोडप्याने खूप उत्साह दाखवला.  
 
ऋषभच्या बहिणी राधिका आणि प्रतिभा आणि साक्षीची भावंडं ऋषिराज आणि राजश्री यांनी लग्नाच्या विधींचा खूप आनंद लुटला. कुटुंबीयांनी साक्षीचा निरोप घेतला आणि तिला ऋषभसह राजसमंद येथे पाठवले. हे लग्न चर्चेत आले आहे. 
 
Edited By - Priya Dixit