मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 16 एप्रिल 2020 (11:06 IST)

पाकिस्तानने भारतासमोर मदतीसाठी पसरले हात

करोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातला आहे ज्यात पाकिस्तानमध्येही स्थिती वाईट आहे. अशात करोनासोबत लढण्यासाठी इम्रान खान सरकारने भारताकडे मदतसाठी हात पसरले आहे. 
 
सुत्रांप्रमाणे पाकिस्तानने भारताकडे हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा पुरवठा करण्यची मागणी केली आहे. हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे औषध करोना व्हायरसवर प्रभावी ठरु शकतं असा अंदाज असल्याने सर्वच देशांमध्ये सध्या या औषधाला प्रचंड मागणी आहे. याआधी अमेरिका आणि ब्राझीलने भारताकडे हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा पुरवठा करण्याची मागणी केली होती. 
 
पाकिस्तानमध्ये करोनाचे सहा हजार रुग्ण सापडले असून 100 जणांचा मृत्यू झाला आहे.
 
याआधी इम्रान खान यांनी पाकिस्तानला मदतीचं आवाहन करत एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यात त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदाय, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेंना पाकसाठी काही ठोस मोहीम राबवण्याची मागणी केली होती. यात त्यांनी कर्ज माफीची याचना देखील केली होती. 
 
उल्लेखनीय आहे की अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प यांनी हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या गोळ्यांचा वापर करण्याचे सुचवले आणि भारताकडून याची मागणी केल्यानंतर या गोळ्यांचे महत्तव आणि मागणी वाढली आहे.