रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

पाकिस्तानत शक्तिशाली बॉम्बस्फोट, 22 जणांचा मृत्यू

पाकिस्तानच्या पाराचिनारमध्ये शक्तिशाली बॉम्बस्फोटात 22 जणांचा मृत्यू झाला आहे. पाराचिनारमधील एका मशिदीमध्ये हा बॉम्बस्फोट घडवण्यात आला आहे. स्थानिक सुन्नी पंथातील धार्मिक कट्टरतावाद्यांनी हा स्फोट घडवल्याचं बोललं जात आहे.

पाकिस्तानच्या पाराचिनारमध्ये एका मशिदीमध्ये महिलांसाठीच्या प्रवेशद्वारावर हा बॉम्ब ठेवण्यात आला होता. शुक्रवारी दुपारी मशिदीमध्ये स्थानिक नागरीक नमाज अदा करण्यासाठी जमले असताना हा स्फोट झाला. यात 22 जण मृत्यूमुखी तर 70 जण गंभीर जखमी झाले आहेत.