रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019 (08:58 IST)

पाकिस्‍ताने आपल्या भारतातील उच्चायुक्तांना परत बोलावले

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील उच्चायुक्त अजय बिसारिया यांना दिल्लीला बोलावले होते. आता पाकिस्‍ताननेही आपल्या भारतातील उच्चायुक्तांना परत बोलावले आहे. पाकचे उच्‍चायुक्‍त सोहेल महमूद यांना चर्चेसाठी पाककडून परत बोलावले आहे. सोहेल महमूद पाकिस्‍तानला रवाना झाल्‍याची माहिती पाकिस्‍तानच्‍या परराष्‍ट्र मंत्रालयकडून देण्‍यात आली आहे. पाकच्‍या परराष्‍ट्र मंत्रालयाकडून यासंबंधीत एका ट्विटमध्‍ये म्‍हटले आहे की, चर्चेसाठी आमच्‍या देशाचे उचायुक्‍त सोहेल महमूद यांना परत बोलवले आहे. ते सोमवारी दिल्‍लीतून पाकिस्‍तानला रवाना झाले आहेत.