1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: इस्लामाबाद , सोमवार, 4 जानेवारी 2021 (11:12 IST)

पाकिस्तानमधील मंदिरावर हल्ला: 8 पोलिस निलंबित, 100 हून अधिक कट्टरपंथ्‍यांना अटक

पाकिस्तानच्या अशांत खैबर पख्तूनख्वा प्रांतात कट्टरपंथी इस्लामिक पक्षाच्या सदस्यांच्या नेतृत्वात जमावाने हिंदू मंदिर उद्ध्वस्त केल्याच्या घटनेनंतर इम्रान सरकारने रविवारी 8 स्थानिक पोलिसांना निष्काळजीपणाच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय या जमावामध्ये सामील झालेल्या 100 हून अधिक लोकांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या मते, इमरान सरकारला या घटनेनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा खराब होण्याची भीती आहे आणि FATFच्या निर्णयावर त्याचा परिणाम होऊ शकतो.
 
डॉनमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार या घटनेसंदर्भात आतापर्यंत 100 लोकांना अटक करण्यात आली आहे. यापैकी रविवारी आणखी 45 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. बुधवारी विस्ताराच्या कामाच्या निषेधार्थ खैबर पख्तूनख्वामधील करक जिल्ह्यातील टेरी गावात मंदिराची तोडफोड करून आग लावण्यात आली. या घटनेसंदर्भात दाखल झालेल्या एफआयआरमध्ये 350 हून अधिक लोकांची नावे आहेत. या प्रकरणात सात प्रमुख आरोपींसह 100 जणांना अटक करण्यात आली आहे, असे पोलिस अधीक्षक (तपास) झहीर शहा यांनी सांगितले. त्याचबरोबर एफआयआरमध्ये नामांकित सर्व 350 जणांना अटक करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
 
लवकरच मंदिराचे पुन्हा बांधकाम केले जाईल
खैबर- पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री महमूद खान यांनी आश्वासन दिले आहे की त्यांचे सरकार लवकरात लवकर खराब झालेले मंदिर आणि समाधी पुनर्निर्माण करेल. शनिवारी उशिरा मुख्यमंत्री सचिवालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, खैबर पख्तूनख्वा सरकारने मंदिरातील नुकसानीचे आकलन करण्यासाठी चार सदस्यांची समिती गठीत केली आहे. समिती हिंदू समाजाच्या सल्लामसलत करून मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी आराखडा तयार करेल. समितीला आपले काम 10 दिवसात पूर्ण करण्यास सांगितले आहे. पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने स्थानिक अधिकार्‍यांना या घटनेशी संबंधित असलेल्या प्रकरणात पाच जानेवारीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.