1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 11 जुलै 2020 (16:35 IST)

कोरोना विषाणू पूर्णपणे नष्ट होण्याची शक्यता नाही

The corona virus
जगातील कोरोनाबाधितांचा आकडा १ कोटी ६३ लाखांहून अधिक आहे. तर मृतांचा आकडा ५ लाख ६३ हजारांहून अधिक आहे. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने शुक्रवारी कोरोना विषाणू संदर्भात मोठे विधान केले आहे. नवीन कोरोना विषाणू पूर्णपणे नष्ट होण्याची शक्यता नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेचे आपत्कालीन विभागाचे प्रमुख डॉ. माईक रेयाना यांनी सांगितले आहे. ते म्हणाले की, ‘सध्या कोरोना विषाणू वेगाने पसरत आहे.’
 
रॉयटर्सच्या माहितीनुसार जिनेव्हा येथे झालेल्या एका ऑनलाईन ब्रीफ्रिंग दरम्यान डॉ. माईक रेयान म्हणाले की, ‘सध्या परिस्थितीत कोरोना विषाणू पूर्णपणे नष्ट होईल असे वाटत नाही आहे.’ पुढे ते म्हणाले की, ‘कोरोना विषाणूचा झपाट्याने होणार प्रसार रोखून पुन्हा लॉकडाऊनच्या स्थितीत जाण्यापासून रोखता येऊ शकते. पण काही ठिकाणी लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय नाही कारण जंगलात लागलेल्या वणव्यासारखा तिथे कोरोना विषाणूचा प्रसार वेगाने वाढत आहे.’