शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: गुरूवार, 9 जुलै 2020 (17:07 IST)

Corona Virus Special: Funny उखाणे

हंड्यावर हंडे सात, त्यावर मांडली परात, 
कोरोनाना हरवायला, बसा आपापल्या घरात
 
मंगळसूत्राच्या 2 वाट्या सासर आणि माहेर,
सगळ्यानी मास्क घालूनच पडा घराबाहेर
 
शंकराच्या पिंडीवर बेलाचं पान ठेवते वाकून,
रोजचे व्यवहार करा सोशलडिस्टंसिंग राखून
 
शिरा बनवायला तूप, साखर, वेलची व रवा आणला जाडा,
रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला प्या आयुर्वेदिक काढा
 
ताजमहल, कुतुबमिनार बनवणारे कारागीर होते ग्रेट,
लक्षण दिसली कोरोना ची तर डॉक्टरना भेटा थेट
 
सूर्याला म्हणतात इंग्रजीत सन, चंद्रला म्हणतात इंग्रजीत मुन,
सॅनिटायझर लावा आल्यावर बाहेरून, बाहेर जाताना घरातून
 
हिमालयात आणि शिमल्यात आहे बर्फाची रास
हँडवॉश व मास्क वापरून करूया कोरोनाचा ऱ्हास
 
काळे मणी, सोनेरी मणी घरभर पसरले,
कोरोनामुळे सगळे इतर आजार विसरले
 
चिमणीला म्हणतात चिऊ, कावळ्याला म्हणतात काऊ, 
आपण घरीच सुरक्षित राहू, विनाकारण बाहेर नका जाऊ
 
चांदीच्या ताटात ठेवले सफरचंदाचे काप,
डॉक्टरांना त्वरित भेटा आला जरी ताप