1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
  4. Powerful explosion in Pakistans Khyber Pakhtunkhwa

पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये नमाजादरम्यान शक्तिशाली स्फोट! पाच पोलिसांसह १६ जण ठार तर २५ जण जखमी

पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील कोहाट परिसरात शुक्रवारच्या नमाजादरम्यान झालेल्या एका शक्तिशाली स्फोटामुळे घबराट पसरली. पोलीस आणि रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ओल्ड पोलीस लाइन्सजवळ झालेल्या या स्फोटात किमान १६ जण ठार आणि अनेक जण जखमी झाले.
 
मृतांमध्ये पाच पोलीस आणि ११ नागरिकांचा समावेश आहे. पाकिस्तानच्या जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, स्फोटकांनी भरलेल्या एका वाहनाने ओल्ड पोलीस लाइन्सच्या गेटला धडक दिल्याने मोठा स्फोट झाला. स्फोटानंतर गोळीबार झाल्याचेही वृत्त आहे.
स्फोट इतका शक्तिशाली होता की त्यामुळे मशिदीबाहेर जमिनीवर एक मोठा खड्डा पडला. स्फोटामुळे मशिदीच्या बाह्य भागाचे नुकसान झाले आणि तिची एक भिंत कोसळली. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली.
 
२५ जखमींना रुग्णालयात दाखल केले
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, २५ जखमींना कोहाट येथील जिल्हा मुख्यालय रुग्णालयात आणण्यात आले. घटनेनंतर रुग्णालयात आणीबाणी जाहीर करण्यात आली. जखमींमध्ये पोलीस अधिकारीही असल्याचे वृत्त आहे. घटनेची माहिती मिळताच, रेस्क्यू पथके घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी बचाव व मदतकार्य सुरू केले. बचाव पथकांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. सुरक्षा दलांनी परिसर सील केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे.
 
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: 
पुढील लेख
सावधान! एलपीजी ई-केवायसीच्या नावाखाली नवीन सायबर फसवणूक होतेय! ओटीपीची मागणी करत कनेक्शन तोडण्याची धमकी