सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

सोशल मीडियावरची 'नवी स्टार'

सोशल मीडियावर निळे डोळे आणि गोंडस चेहऱ्याची बाहुली नवी स्टार ठरली आहे. तिचं ते निरागस, गोंडस रुप पाहून अनेकांनी तिची तुलना नाजूक बाहुलीशी केली आहे. या मुलीचं नाव आहे अ‍नेस्तिया कोनेजेवा. ती रशियाची आहे. वय वर्ष सहा असणाऱ्या अनेस्तियानं रशियातल्या नावाजलेल्या फॅशन ब्रँडसाठी मॉडेलिंग केलं आहे.
 
किडस वेअरसाठी मॉडेलिंग करता करता निळ्या डोळ्यांची अ‍नेस्तिया इतकी प्रसिद्ध झालं की लगेच ती सेलिब्रिटी बनली. चार वर्षांची असताना अ‍नेस्तिया किड वेअरसाठी मॉडेलिंग करू लागली. तिची प्रसिद्धी पाहून तिच्या आईनं तिचं इन्स्टाग्राम अकाऊंट सुरू केलं. अवघ्या सहा वर्षांची असलेल्या अ‍नेस्तियाचे सोशल मीडियावर जवळपास ५ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.