सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 13 डिसेंबर 2017 (10:33 IST)

चीनने डोकलाममध्ये नवे रस्ते बनवले

चीनने गेल्या दोन महिन्यांत डोकलाममध्ये नवे रस्ते बनवले आहेत.  सीमेपासून जवळच्या भागातील सॅटेलाईट छायाचित्रांवरून ही माहिती मिळतेय की ‘चीनी रोड वर्कर्स’ने या वादग्रस्त भागात सध्याच्या रस्त्यांचा विस्तार केला आहे. आश्चर्याची बाब ही आहे की, काही महिन्यांपूर्वी ७० दिवस भारत आणि चीनी सैनिक एकमेकांसमोर उभे ठाकले होते. त्या ठिकाणाहून हा रस्त्यांचा भाग जवळच आहे.

सॅटेलाईट छायाचित्रांवरुन हे स्पष्ट होते की, चीनने डोकलामच्या वादग्रस्त भागात नवे रस्ते बनवले आहेत. या मार्गांवर आलिकडील रस्त्यांचा विस्तार एक किमीपर्यंत झाला आहे. हा रस्ता वादग्रस्त जागेपासून साडेचार किमी अंतरावर आहे. तर सीमेपासून दुसऱ्या रस्त्यांचा झालेला विस्तार वादग्रस्त भूमीपासून ७.३ किमी अंतरावर आहे. उत्तरेकडे हा रस्ता १.२ किमी अंतरावर पसरला आहे.