1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 20 जुलै 2025 (11:20 IST)

व्हिएतनाममध्ये वादळात पर्यटकांची बोट उलटली, 34 जणांचा मृत्यू

boat
शनिवारी दुपारी व्हिएतनाममधील एका पर्यटन स्थळाला भेट देत असताना अचानक आलेल्या वादळात पर्यटकांनी भरलेली एक बोट उलटली. या अपघातात 34 जणांचा मृत्यू झाला, तर 8 जण अजूनही बेपत्ता आहेत. देशाच्या सरकारी माध्यमांनी ही माहिती दिली. 
'वंडर सी' नावाची ही बोट 48 प्रवासी आणि पाच क्रू मेंबर्ससह हालोंग बेच्या प्रवासावर होती. हे सर्व व्हिएतनामी नागरिक होते. बचाव कर्मचाऱ्यांनी 11 जणांना सुरक्षितपणे वाचवले आहे आणि अपघातस्थळाजवळ अनेक मृतदेहही बाहेर काढले आहेत. जरी आधी 12 जणांना वाचवण्यात आल्याचे वृत्त होते, परंतु नंतर ही संख्या 11 करण्यात आली.
 वृत्तपत्राने वृत्त दिले आहे की जोरदार वाऱ्यामुळे बोट उलटली. एका 14 वर्षाच्या मुलाचाही बचाव झाला. तो मुलगा चार तास उलटलेल्या बोटीतच राहिला, त्यानंतर त्याला सुरक्षितपणे वाचवण्यात आले. अहवालात असेही म्हटले आहे की बहुतेक प्रवासी पर्यटक होते आणि त्यापैकी सुमारे 20 मुले होती. हे सर्व लोक व्हिएतनामची राजधानी हनोई येथून आले होते.