मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 7 नोव्हेंबर 2024 (09:18 IST)

व्हिएतनाम हवाई दलाचे विमान कोसळले, दोन पायलट बेपत्ता

plane crash
व्हिएतनामच्या बिन्ह दिन्ह प्रांतात व्हिएतनामी हवाई दलाचे याक-130 लढाऊ प्रशिक्षण विमान कोसळले असून त्याचे दोन पायलट बेपत्ता आहे. व्हिएतनामी माध्यमांनी बुधवारी ही माहिती दिली.
 
मिळालेल्या माहितीनुसार 940 व्या व्हिएतनामी एअर फोर्स रेजिमेंटचा भाग असलेले रशियनचे याक-130 विमान फु कॅटपासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावरील डोंगराळ भागात तांत्रिक बिघाडामुळे स्थानिक वेळेनुसार सकाळी 10:30 वाजता क्रॅश झाले.  
 
अपघातग्रस्त विमान आणि त्याच्या दोन पायलटचा शोध घेण्यात स्थानिक अधिकारी व्यस्त असून या अपघाताचे कारण अद्याप समजले नसून हवाई दलाचे अधिकारी तपास करत आहे.