शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: लंडन , बुधवार, 2 डिसेंबर 2020 (15:57 IST)

Pfizer च्या Corona Vaccineला युकेमध्ये ग्रीन सिग्नल, पुढील आठवड्यापासून मिळेल

ब्रिटनने फायझर / बायोएनटेकच्या कोरोनाव्हायरस लसला मान्यता दिली आहे. आपत्कालीन परिस्थितीचा वापर करण्यासाठी लसीला औषधी व आरोग्य सेवा नियामक प्राधिकरणाने मान्यता दिली आहे.
 
ब्रिटन हा कोरोनासाठी लस मंजूर करणारा पहिला पाश्चात्त्य देश आहे. शेवटच्या टप्प्यातील चाचणीत ही लस सुमारे 95 टक्के प्रभावी असल्याचे आढळले. Modernaच्या लसीमुळे तरुणांमध्ये तसेच वृद्ध लोकांमध्ये प्रतिपिंडे तयार झाले, ज्याने व्हायरसविरुद्ध कार्य केले. पुढील आठवड्यापासून लसीकरणाचे काम सुरू होईल असे सांगण्यात येत आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, फायझरची ही लस ज्यांना संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे अशा लोकांकडे जाईल. यासह ज्यांना संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे त्यांना Pfizer/BioNTech  लस दिली जाईल.
 
यापूर्वी, युके लसीकरण मंत्री नदिम जाहावी यांनी एका माध्यम अहवालात असे नमूद केले आहे की जर सर्व काही योजनेनुसार चालले असेल आणि Pfizer/BioNTech यांनी विकसित केलेली लस मंजूर झाली तर काही तासांच्या आत लस पोचविणे आणि लसीकरण सुरू केले जाईल.