बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020 (16:02 IST)

जे जे रूग्णालयातही आता कोरोना लस चाचणी

मुंबईतल्या जे जे रूग्णालयातही आता कोरोना लस चाचणी होणार आहे. भारत बायोटेकने बनवलेल्या स्वदेशी 'लस'ची चाचणी जेजे रूग्णालयात होणार आहे. पुढील आठवड्यात या चाचणीला सुरूवात होणार आहे. १ हजार स्वयंसेवकांना ही लस दिली जाणार आहे. त्याआधी सायन रूग्णालयातही भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीन 'कोरोना लस'ची चाचणी होणार आहे. तर केईएम आणि नायर रूग्णालयात सिरम इन्स्टिट्यूट बनवत असलेल्या कोवीशिल्ड 'लस'ची चाचणी सुरू आहे.
 
तर दुसरीकडे पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट कोरोनावर लस निर्मिती केली आहे. याची चाचणी तिसऱ्या टप्प्यात आहे. त्यामुळे ही लस पुढील वर्षी म्हणजेच दोन ते तीन महिन्यात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.