संबंधित माहिती
- रिलायन्स जिओने स्वदेशी वेब ब्राउझर JioPages बाजारात आणला असून, त्या आठ भारतीय भाषांना पाठिंबा देतील
- हात झटकून केंद्राला बोट दाखवणं बंद करा, शेतकऱ्यांना भरघोस मदत करा : फडणीस
- येत्या 25 ऑक्टोबरपासून जिम आणि फिटनेस सेंटर्स उघडणार
- पंतप्रधान-किसान योजनेंतर्गत 47 लाखाहून अधिक शेतकर्यांतचे देयके रोखले, कारण काय आहे ते जाणून घ्या
- पुण्यातील ४ कोव्हिड केअर सेंटर आणि ९ विलगीकरण कक्ष तात्पुरते बंद होणार
मुंबईत मोफत कोविडविषयक वैद्यकीय चाचणी केंद्र सुरू
मुंबईत पालिकेतर्फे २ नोव्हेंबरपासून २४४ ठिकाणी मोफत कोविडविषयक वैद्यकीय चाचणी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. या सुविधेमुळे करोना चाचणी करण्याची सुविधा पालिका क्षेत्रात ३०० पेक्षा अधिक ठिकाणी उपलब्ध होईल.
पालिकेच्या अखत्यारीतील विविध दवाखाने, रुग्णालये अशा एकूण २४४ ठिकाणी मोफत वैद्यकीय चाचण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
या २४४ ठिकाणांच्या पत्त्यांची यादी विभागनिहाय नियंत्रण कक्षांद्वारे आणि महापालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या १९१६ या क्रमांकाद्वारेही उपलब्ध करून देण्यात येत आहे. http://stopcoronavirus.mcgm.gov.in या संकेतस्थळावरदेखील यादी उपलब्ध असेल. सुरुवातीस रोज सकाळी १० ते १२ या कालावधीत ही चाचणी सुविधा केंद्रावर वॉक इन पद्धतीने उपलब्ध असणार आहे.
