मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 5 फेब्रुवारी 2024 (14:56 IST)

येमेनमधील हुती बंडखोरांच्या तळावर अमेरिकेचे हल्ले

रविवारी अमेरिकेने येमेनमधील हुतींच्या क्षेपणास्त्र तळांवर हल्ले केले, असं अमेरिकेच्या सेंट्रल कमांड (सेंटकॉम) ने ‘एक्स’वरील एका निवेदनात म्हटलंय.
 
सेंटकॉमने सांगितलं की अमेरिकन सैन्याने हुतींच्या तळांना लक्ष्य केले. लाल समुद्रातील जहाजांना लक्ष्य करण्यासाठी ही क्षेपणास्त्रं वापरण्यात येणार होती, ती अमेरिकेनी नष्ट केल्याचा दावा अमेरिकेनी केला.
 
अमेरिका-इंग्लंडने हुतींच्या नियंत्रणाखालील भागावर हल्ले केल्याच्या दुसऱ्या दिवशी ही नवीन लष्करी कारवाई करण्यात झाली.
 
इराणचा पाठिंबा असलेल्या येमेनी हुती गटांकडून लाल समुद्रातील लष्करी आणि मालवाहतूक करणाऱ्या जहाजांवर सतत होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.
हुतींच्या हल्ल्यांमुळे मोठ्या शिपिंग कंपन्यांना जलमार्गाचा वापर बंद करावा लागला आहे, ज्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय व्यापारावर झालाय.
 
इजिप्तने म्हटलंय आहे की, सुएझ कालव्यातून मिळणारा महसूल जानेवारी महिन्यात जवळपास निम्म्याने घसरला आहे, मागच्या महिन्यात प्रमुख व्यापारी जलमार्गांने प्रवास करणाऱ्या जहाजांची संख्या एक तृतीयांशपेक्षा कमी झाली आहे.
 
'हल्ल्यांमुळे जमीन हादरली'
अमेरिका-ब्रिटनतर्फे शनिवारी करण्यात आलेल्या संयुक्त हल्ल्यांनी येमेनची राजधानी साना शहरावर परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं.
 
हल्ल्यामुळे घरं हादरत होती असं एका मानवाधिकार कार्यकर्त्याने आणि स्थानिक रहिवाशाने बीबीसीला सांगितलं.
 
अमेरिकेच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या हल्ल्याला योग्य उत्तर दिलं जाईल असा इशारा हुती बंडखोरांनी दिला आहे.
 
शनिवारच्या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना गटाचे लष्करी प्रवक्ते याह्या सारिया यांनी ‘एक्स’वर लिहिलं: “हे हल्ले आम्हाला गाझा पट्टीतील पॅलेस्टिनी लोकांच्या समर्थनार्थ आमच्या नैतिक, धार्मिक आणि मानवतावादी भूमिकेपासून परावृत्त करू शकणार नाहीत आणि त्याला कोणतंही उत्तर मिळणार नाही किंवा त्याचे कुठलेही परिणाम भोगावे लागणार नाहीत, असं गृहित धरता कामा नये.”
 
Published By- Priya Dixit