शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 5 फेब्रुवारी 2024 (14:32 IST)

तांदूळ, डाळीच्या भावात विक्रमी वाढ

pulses
देशात दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. इंधन, घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरचे दर गगनाला भिडले आहे. वाढत्या महागाईमुळे अन्न धान्याचे दरही वाढले आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य माणसाच्या खिशाला ओझं होत आहे. 
 
तूरडाळ आणि धानच्या पिकाचं पावसामुळे नुकसान झाल्यामुळे डाळ तांदुळाच्या दरात वाढ झाली आहे. खरिपाचे उत्पादन घटले आहे. या वर्षी उत्पादनाचा आकडा कमी झाल्यामुळे तांदूळ आणि डाळीच्या किमतीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. 
 
साधारणपणे डाळी दिवाळीनंतर बाजारात येतात.अवकाळी पावसामुळे या वर्षी तूर डाळीच्या उत्पादनात चार टक्के घट  झाली आहे. 
ग्राहकांना निवडुकाच्या काळात महागाईला सामोरी जावे लागू नये या साठी केंद्र सरकारने निर्यातीवर बंदी घातली आहे. या मुळे  व्यापाऱ्यांमध्ये नाराजी दिसत आहे. 
 
ग्राहकांसाठी  केंद्राकडून दरात दरात "भारत तांदूळ "आणि भारत डाळ ब्रँड अंतर्गत  देणार आहे. निवडणुकानंतर डाळ आणि तांदुळाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. 
 
 
 Edited by - Priya Dixit