शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

LPG Cylinder Price hike today अर्थसंकल्पाच्या दिवशीच महागाईचा बॉम्ब फुटला, एलपीजी सिलिंडरचे भाव वाढले, जाणून घ्या किंमत काय?

LPG Cylinder Price hike today: फेब्रुवारीच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांवर महागाईचा बॉम्ब फुटल्याने मोठा धक्का बसला. आज सकाळी पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे.
 
लग्नसराईच्या काळात वाढलेली मागणी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किमती प्रभावित झाल्यामुळे आज एलपीजी सिलिंडरच्या दरात 14 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
 
पण ही वाढ 19 किलोग्रॅमच्या व्यावसायिक सिलिंडरवर झाली असली तरी घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही, ही मोठी दिलासादायक बाब आहे.
 
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या नव्या किमती आजपासून लागू झाल्याची माहिती आहे. तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किमती अपडेट करतात. 1 जानेवारीलाही 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली होती, मात्र आज ही दरवाढ करण्यात आली आहे.
 
नवीन किमतींनंतर आता चारही शहरांमध्ये एलपीजी सिलेंडरच्या किमती पुढीलप्रमाणे आहेत: दिल्लीत 1769.50 रुपये, कोलकात्यात 1887.00 रुपये, मुंबईत 1723.50 रुपये, चेन्नईत 1937 रुपये.