बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 जानेवारी 2019 (09:09 IST)

शाओमीकडून पहिल्यांदाच भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण

चीनची कंपनी शाओमीने पहिल्यांदा भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण केले. प्रदूषण रोधक मास्कची विक्री MI.COM या वेबसाइटवर सुरु आहे. मास्कची किंमत २४९ रुपये आहे.
 
तंत्रज्ञान कंपनी एमआयचा दावा आहे की या मास्कमुळे धूळ आणि धुळीमध्ये लपलेल्या लहान कणांपासून ९९ टक्क्यांपर्यंत बचाव करता येणार आहे. या प्रदूषणरोधक मास्कमध्ये ४ थर (लेयर) लावण्यात आले आहेत. मास्कच्या मदतीने हवेत मिसळणारे धूलीकण रोखून शुद्ध हवा मिळवता येईल. तसेच श्वास घेतानादेखील त्रास होणार नाही. कंपनीच्या माहितीनुसार मास्क अगदी मऊ आणि आरामदायक आहे. गरज नसल्यास याची रुमालासारखी घडी करुन ठेवता येईल.   हवा शुद्ध करणाऱ्या मास्कचे चीनमध्ये २०१६ला अनावरण करण्यात आले होते. यात हायफायबर टेक्स्टाइलचा वापर करण्यात आला होता.