गुरूवार, 25 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2017
Written By

मुंबईचे खेळाडू लढवय्ये: गावस्कर

आयपीएल
आयपीएल सत्र दहाच्या हंगामात मुंबई इंडियन्स संघाने खराब सुरूवाती नंतर विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी शर्यतीने प्रयत्न करीत विजय खेचून आणले आहेत. आणि मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंची ही लढवयी वृत्ती खरच वाखाणण्या जोगी अशीच आहे. असे सुनील गावस्कर यांचे म्हणणे पडले.
 
रोहित शर्मा भारतीय संघातर्फे टी-20 आणि वनडे क्रिकेट मध्ये सलामीला खेळतो, पण कुठल्यातरी विचित्र कारणामुळे यंदाच्या आयपीएल स्पर्धेत तो मधल्या फळीत खेळत आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सला अपेक्षित सुरूवात मिळू शकलेली नाही. मुंबई इंडियन्सने जसे हरभजनला खेळविण्याचा निर्णय घेतला तसा कर्णधाराला सलामीला पाठविण्याचा निर्णय घ्यायाला हवा.