1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2020
Written By
Last Modified शनिवार, 26 सप्टेंबर 2020 (12:34 IST)

चेन्नईचा सलग दुसरा पराभव

महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला आयपीएलच्या तेराव्या हंगामात सलग दुसर्‍या   पराभवाला सामोरे जावे लागले. दिल्ली कॅपिटल्सने चेन्नईवर 44 धावांनी मात केली. विजयासाठी दिलेले 176 धावांचे लक्ष्य चेन्नईला पूर्ण करता आले नाही. दिल्लीच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून चेन्नईच्या फलंदाजांवर अंकुश ठेवत सामन्यावर आपले वर्चस्व राखले होते. दिल्लीने दिलेाल्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईने सावध सुरुवात केली. परंतु अक्षर पटेलने वॉटसनला माघारी धाडले आणि चेन्नईच्या डावाला गळती लागली. यानंतर मुरली विजय, ऋतुराज गायकवाड ठरावीक अंतराने माघारी परतले.

यानंतर केदार जाधव आणि फाफ डू प्लेसिस यांनी भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला; परंतु मधल्या षटकात अपेक्षित धावगती राखणत हे फलंदाज अपयशी ठरले. ज्यामुळे चेन्नईसमोरचे आव्हान अधिक बिकट झाले. डू प्लेसिस (43) आणि केदार जाधव (26) माघारी परतल्यानंतर धोनी (15) आणि रवींद्र जडेजा (12) यांनी फटकेबाजीचा प्रयत्न केला. परंतु त्यांचे प्रयत्नही तोकडे पडले. दिल्लीकडून कगिसो रबाडाने 3, नॉर्टजेने 2 तर अक्षर पटेलने 1 बळी घेतला.