IPL 2020: ब्रॅड हॉगने मुंबई इंडियन्सविषयी या दोन भविष्यावाणी केल्या आहेत, काय ते जाणून घ्या
रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स प्रीमियर लीग (IPL 2020) ची प्रबळ दावेदार असल्याचे म्हटलं जात आहे. गेल्या वर्षी झालेल्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला निव्वळ एका धावाने पराभूत करून चार वेळा विजेतेपद मुंबई इंडियन्स ने पटकविले होते. या संघात दर्जेदार खेळाडू आहेत, जे मागील वर्षी युएई मधील केलेली कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचे इच्छुक आहेत. तरी ही ऑस्ट्रेलियाच्या माजी फिरकीपटू ब्रॅड हॉग ने म्हटले आहे की यंदाच्या वर्षी मुंबई इंडियन्स या मोसमात अव्वल पद पटकविणार जरी नसले तरी ते पहिल्या चार संघात असणार आहेत.
ब्रॅड हॉग यांनी आपल्या यू ट्यूब चॅनल वर म्हटले आहे की "मुंबई इंडियन्स जवळ अष्टपैलू, चांगले फिरकीपटू आणि पेस बॅटरी (वेगवान बॅटरी) आहेत". या संघासाठी प्लेइंग इलेवन निवडणे ही त्यांचा साठी मोठी समस्या आहे. ब्रॅड हॉग म्हणतात की मुंबई इंडियन्स मध्ये प्लेइंग इलेवन निवडणे हीच सर्वात मोठी कमतरता असणार. ब्रॅड हॉगचे म्हणणे आहे की सूर्यकुमार यादव सर्वात श्रेष्ठ प्रदर्शन करू शकतो. मागील काही वर्षात त्याने सातत्याने प्रगती केली आहे. तो म्हणाला," मुंबई इंडियन्स सह सूर्यकुमार देखील खेळाचा आनंद घेत आहे.
सूर्यकुमारने मागील 2 हंगाम्यात 400 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. मध्यम क्रमात तो कुठेही खेळू शकतो. IPL मध्ये सूर्यकुमार याने आतापर्यंत 85 सामन्यात 28.14 च्या सरासरीने 1548 धावा केल्या आहेत.
सांगाचये म्हणजे की रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली यंदा संघ पाचव्या विजेतेपदावर लक्ष केंद्रित करण्याचे दिसणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स 4 वेळा आयपीएल विजेतेपद पटकवणारा एकमेव संघ आहे. मुंबई इंडियन्स हे 2013, 2015, 2017 आणि 2019 मध्ये चॅम्पियन बनले होते.
संपूर्ण टीम खालील प्रकारे आहे :
रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, क्रुणाल पांड्या, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, राहुल चाहर, अनमोलप्रीत सिंह, जयंत यादव, आदित्य तारे, अनुकूल रॉय, धवल कुलकर्णी, क्विंटन डिकॉक, कीरोन पोलार्ड, लसिथ मलिंगा, मिशेल मैकक्लाघेन, क्रिस लिन, सौरभ तिवारी, नाथन कूल्टर नाइल, मोसिन खान, दिग्विजय देशमुख.