रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2020
Written By
Last Modified: बंगळुरू , गुरूवार, 24 सप्टेंबर 2020 (12:09 IST)

सट्टा लावणारे सहाजण अटकेत

सर्वात श्रीमंत अशा आयपीएल स्पर्धेला मोठ्या प्रमाणावर चाहतावर्ग आहे. मात्र, काही लोक अशा स्पर्धांचा वापर करून सट्टेबाजी करण्यासाठी करतात. त्यातच आयपीएलच्या सामन्यांवर सट्टा लावणार्या सहाजणांना कर्नाटकात अटक करण्यात आल्याची माहिती पीटीआयने दिली. या सहाजणांना दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक करण्यात आली. त्याचसोबत त्यांच्याकडून सहा लाखांची रोकडही जप्त करणत आली.
 
केंद्रीय गुन्हे शाखेने ही कारवाई केली. बनासवाडी आणि मल्लेश्वरम या दोन ठिकाणांहून या सहाजणांना अटक केले. त्यामुळे या सहाजणांविरूद्ध एकूण दोन खटले दाखल करण्यात आले आहेत. सट्टेबाज प्रत्येक चेंडू, प्रत्येक षटक आणि संघांची हार-जीत यावर इतरांकडून सट्‌ट्यासाठी पैसे घेत होते. केंद्रीय गुन्हे शाखेला माहिती मिळताच त्यांनी अटकेची कारवाई केली.