गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2022
Written By
Last Modified: बुधवार, 2 मार्च 2022 (15:13 IST)

आयपीएलसाठी स्टेडियममध्ये 25 टक्के प्रेक्षक उपस्थितीला परवानगी

25 per cent spectator attendance is allowed in the stadium for IPL
आयपीएल स्पर्धेच्या  महाराष्ट्रात होत असलेल्या सामन्यांसाठी स्पर्धेच्या सुरुवातीच्या दिवसांत स्टेडियममध्ये 25 टक्के प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्र सरकारने आपला निर्णय जाहीर केला आहे. आठ दिवसांनंतर परिस्थितीचा आढावा घेऊन स्टेडियममध्ये 50 टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्याची राज्य सरकारची  तयारी आहे. 
 
येत्या 26 मार्चपासून IPL सामन्यांना सुरूवात होणार आहे 22 मेपर्यंत ही स्पर्धा सुरू राहणार आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे  यांच्या प्रमुख उपस्थितीत, तसेच मुंबई प्रीमियर लीगचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथी गृह येथे बैठक पार पडली. यात सदरचा निर्णय घेण्यात आला आहे.