रविवार, 14 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2022
Written By
Last Modified: गुरूवार, 21 एप्रिल 2022 (15:01 IST)

मुंबई इंडियन्ससाठी आज ‘करो या मरो’; रोहित शर्माचीही कसोटी

'Do or die' for Mumbai Indians today; Rohit Sharma's Test too
सलग सहा पराभवानंतर आयपीएलमधून बाद होण्याच्या मार्गावर असलेला मुंबई इंडियन्स (MI), गुरुवारी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध मॅच खेळणार आहे. आतापर्यंत पाच वेळा मुंबई इंडियन्सने आयपीएल जिंकले आहे. पण यंदा मात्र एकही सामना त्यांनी जिंकलेला नाही. गुरुवारी चेन्नई विरुद्ध ते हरल्यास त्यांना स्पर्धेतून बाहेर पडावे लागेल. गतविजेत्या चेन्नईची स्थितीही यावर्षी फारशी चांगली नाही. ही टीमदेखील सहापैकी पाच सामने पराभूत झाली आहे.
 
मुंबईसाठी सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे कर्णधार रोहित शर्माचा फॉर्म, ज्याने सहा सामन्यांत केवळ ११४ धावा केल्या आहेत. मुंबईला प्रथम खेळताना लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल किंवा मोठी धावसंख्या करायची असेल, तर रोहितला मोठी खेळी खेळावी लागेल. तरूण फलंदाज इशान किशनलाही त्याची १५.२५ कोटी रुपयांची किंमतीला जागता आलेले नाही. त्याने सहा सामन्यांत दोन अर्धशतकांच्या मदतीने १९१हून अधिक धावा केल्या आहेत. डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी काही चांगल्या खेळी केल्या आहेत. त्यांच्यावर आता काही जबाबदारी टाकण्यात येणार असल्याचे दिसत आहे.
 
अष्टपैलू किरॉन पोलार्डनेही आतापर्यंत निराश केले आहे. त्याची सामना जिंकणारी प्रतिमा आता मलीन होत चालली आहे. तो आतापर्यंतच्या प्रत्येक सामन्यात अपयशी ठरला असून त्याने केवळ ८२ धावा केल्या आहेत. गुरुवारी होणाऱ्या सामन्यामध्ये मुंबईकडे चांगली फलंदाजी आहे. ती चेन्नईविरुद्ध लढण्यासाठी मदतीची ठरु शकते. मुंबईसाठी फलंदाजीपेक्षा गोलंदाजी हा चिंतेचा विषय आहे. जसप्रीत बुमराह वगळता त्याच्या इतर गोलंदाजांनी आतापर्यंत खराब कामगिरी केली आहे. टायमल मिल्स, जयदेव उनाडकट, बेसिल थम्पी किंवा मुख्य फिरकीपटू मुरुगन अश्विन यांना आता सर्वोत्तम कामगिरी करण्याची गरज आहे.
 
लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात मिल्सने तीन षटकात ५४ धावा दिल्या, तर उनाडकट आणि अश्विनने अनुक्रमे ३२ आणि ३३ धावा दिल्या. मुंबईने फॅबियन ऍलनचा प्रयत्न केला पण तोही चार षटकांत ४६ धावा गमावला. ऋतुराज गायकवाडचे फॉर्ममध्ये परतणे चेन्नईसाठी सकारात्मक संकेत आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्याने ४८ चेंडूत ७३ धावा केल्या होत्या. रॉबिन उथप्पा आणि शिवम दुबे यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध त्यांच्या आक्रमक फलंदाजीचे उत्तम उदाहरण मांडले होते, पण गुजरातविरुद्ध तेही फारशी कमला दाखवू शकले नाहीत. कर्णधार रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंग धोनी फिनिशरची उत्तम भूमिका बजावू शकतात.