रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2022
Written By
Last Modified: सोमवार, 2 मे 2022 (20:29 IST)

IPL 2022: महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपदाची सूत्रे हाती घेताच राहुल द्रविडचा अनोखा विक्रम मोडला आणि असे करणारा तो पहिला कर्णधार ठरला

dhoni
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीने पुन्हा एकदा आयपीएलमध्ये प्रवेश केला आहे. धोनीने 15 व्या सत्राला सुरुवात होण्यापूर्वी सीएसकेचे कर्णधारपद सोडले होते आणि संघाची कमान रवींद्र जडेजाकडे सोपवली होती. मात्र, जडेजा कर्णधारपदाचे दडपण सांभाळू शकला नाही आणि त्याच्या नेतृत्वाखाली संघाला 8 पैकी 6 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. पण धोनीने पुन्हा एकदा सीएसकेची धुरा आपल्या हातात घेतली आहे. धोनीने कर्णधारपदाची सूत्रे हाती घेताच चेन्नई एक्सप्रेसने विजयाची गती पकडली आणि सनरायझर्स हैदराबादचा 13 धावांनी पराभव करून हंगामातील तिसरा विजय नोंदवला.
 
हैदराबादविरुद्धच्या सामन्यात धोनीने कर्णधार म्हणून मैदानात येताच राहुल द्रविडचा अनोखा विक्रम मोडला. धोनी आता T20 क्रिकेटमध्ये संघाचे नेतृत्व करणारा सर्वात वयस्कर भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. माहीने 40 वर्षे 298 दिवसांच्या वयात पुन्हा एकदा CSK ची कमान आपल्या हातात घेतली. धोनीपूर्वी हा विक्रम राहुल द्रविडच्या नावावर होता, ज्याने वयाच्या 40 वर्षे 268 दिवसांत राजस्थान रॉयल्सचे कर्णधारपद भूषवले होते. इतर भारतीयांमध्ये सुनील जोशी (40 वर्षे 135 दिवस), अनिल कुंबळे (39 वर्षे 342 दिवस) आणि सौरव गांगुली (39 वर्षे 316 दिवस) यांचा समावेश आहे.