मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2022
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 एप्रिल 2022 (21:58 IST)

IPL 2022:मुंबई इंडियन्समध्ये सूर्यकुमार यादव राजस्थान विरुद्धच्या सामन्यापूर्वी संघात दाखल

IPL 2022: Suryakumar Yadav joins Mumbai Indians squad before match against Rajasthan IPL 2022:मुंबई इंडियन्समध्ये सूर्यकुमार यादव राजस्थान विरुद्धच्या सामन्यापूर्वी संघात दाखल  Marathi IPL 2022 Cricket News
आयपीएल 2022 ची सुरुवात मुंबई इंडियन्ससाठी चांगली झाली नाही आणि त्यांना पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव स्वीकारावा लागला. पाच वेळच्या चॅम्पियनला आता शनिवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध दुसरा सामना खेळायचा आहे. या सामन्यापूर्वी त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव दुखापतीतून सावरल्यानंतर संघात दाखल झाले आहे. 
 
सूर्याला गेल्या महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरच्या मालिकेदरम्यान दुखापत झाली होती. त्यांच्या बोटाला दुखापत झाली, त्यानंतर ते पुनर्वसनासाठी बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत गेले. मुंबईने कायम ठेवलेल्या सूर्याला क्वारंटाइनमध्ये राहिल्यामुळे दिल्लीविरुद्धच्या पहिल्या सामन्यातून बाहेर पडावे लागले. पण आता  ते बरे झाले असून क्वारंटाईनमधूनही बाहेर आले आहे.
 
गुरुवारी मुंबई इंडियन्सने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सूर्यकुमार यादव क्वारंटाइन सोडून संघात सामील झाले आहे. ते किरॉन पोलार्ड, इशान किशन आणि जसप्रीत बुमराहसह जिममध्ये पोहोचले. प्रत्येकाने येथे फिटनेस आणि स्ट्रेंथ सेशनमध्ये भाग घेतला आणि पुढील सामन्याच्या तयारीत गुंतले.