शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2022
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (20:48 IST)

IPL 2022: कोलकाता नाईट रायडर्सचा नवा कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरची नियुक्ती

Shreyas Iyer
कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ने आयपीएल 2022 हंगामासाठी आपल्या नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. केकेआरने भारतीय फलंदाज आणि दिल्ली कॅपिटल्सचा माजी कर्णधार श्रेयस अय्यरकडे संघाची कमान सोपवली आहे. केकेआरने श्रेयसला मेगा ऑक्शन (IPL 2022 ऑक्शन) मध्ये 12.25 कोटी रुपयांना खरेदी केले. कोलकाता नाइट रायडर्सने श्रेयस अय्यरच्या नियुक्तीची घोषणा बुधवारी, १६ फेब्रुवारी रोजी एका ट्विटद्वारे केली. अय्यर केकेआरचा कर्णधार म्हणून इयॉन मॉर्गनची जागा घेतील, ज्याने गेल्या हंगामात संघाला अंतिम फेरीत नेले होते. मात्र, फलंदाजीत अपयश आल्याने कोलकाताने मॉर्गनला कायम ठेवले नाही आणि या वेळी लिलावात पुन्हा खरेदीही केली नाही. केकेआर नवीन कर्णधाराच्या शोधात होता आणि या प्रयत्नात फ्रँचायझीने अय्यरला विकत घेण्यासाठी मोठी रक्कम खर्च केली.
 
कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ने आयपीएल 2022 हंगामासाठी आपल्या नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. केकेआरने भारतीय श्रेयस अय्यर गेल्या मोसमापर्यंत दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता आणि दुसऱ्यांदाच लिलावात आला होता. 2018 च्या हंगामात त्याला दिल्ली कॅपिटल्सने कर्णधार बनवले आणि त्यानंतर 2020 हंगामात त्याने संघाला अंतिम फेरीत नेले. श्रेयसच्या नेतृत्वाखाली दिल्लीचा संघ प्रथमच आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचला होता, जिथे त्यांना मुंबईकडून पराभव स्वीकारावा लागला होता.