रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2023
Written By
Last Modified: शुक्रवार, 31 मार्च 2023 (23:47 IST)

Gujarat Titans vs Chennai Super Kings : चेन्नईला हरवत गुजरातची विजयी सलामी

ipl 2023
Gujarat Titans vs Chennai Super Kings : IPL (IPL-2023) च्या 16 व्या मोसमात गुजरात टायटन्सने विजयाने सुरुवात केली. त्याने मोसमातील पहिल्याच सामन्यात 4 वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जचा 5 विकेट्सने पराभव केला.
 
ऋतुराज ने खेळली तुफानी खेळी  
आयपीएलच्या 16व्या मोसमातील पहिल्या सामन्यात गतविजेत्या गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून 4 वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. चेन्नईने निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 178 धावा केल्या. सलामीवीर ऋतुराज गायकवाडने तुफानी खेळी केली. त्याने 50 चेंडूत 4 चौकार आणि 9 षटकारांसह 92 धावा केल्या. त्याच्याशिवाय तिसऱ्या क्रमांकावर उतरलेल्या मोईन अलीने 17 चेंडूंत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 23 धावा केल्या.