शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 1 जून 2022 (16:17 IST)

Hardik Pandya Fan हार्दिक पंड्याच्या फॅन ने गुजरात टायटन्सने विजेतेपद मिळवल्यावर आपलं आणि आपल्या सलूनचं नाव बदललं

गुजरात टायटन्सने आयपीएल 2022 चे विजेतेपद पटकावले. संघाच्या विजयाचा हिरो ठरलेल्या हार्दिक पांड्याचे चाहते या विजयाचा आनंद साजरा करत आहेत. असाच एक जबरा चाहता बिहारमध्येही समोर आला आहे. बिहारच्या नवादा येथे राहणारा रवी हा हार्दिक पांड्याचा इतका चाहता आहे की त्याने आपल्या नावासोबत पांड्या हे आडनाव जोडून आपले नाव बदलून रवी पांड्या असे ठेवले आहे.
 
रवी पांड्याने आपल्या आवडत्या खेळाडूला शुभेच्छा दिल्या आहे. रवीचे सलून आहे ते क्रिकेटचे मोठे फॅन असून त्यांनी गुजरात टायटन्स विजेतेपद मिळवल्यावर आपल्या सलून मध्ये एकदिवस मोफत सलून केले. त्यांनी आपल्या सलूनचे नाव पांड्याजेन्टस पार्लर असे केले आहे. रवीची दुकान नवादा नगरच्या ठाणे क्षेत्रात अकौना रोड वर आहे.  
 
गुजरात टायटन्स हा त्याचा आवडता संघ असून हार्दिक हा त्याचा आवडता खेळाडू असल्याबद्दल रवीने आनंद व्यक्त केला. रवीने सोशल मीडियावर सलूनमध्ये मोफत सेवेची घोषणा केली. यानंतर सकाळपासूनच लोक त्याच्या पार्लरमध्ये येऊ लागले. रवी म्हणाला की, हार्दिक पांड्याला भेटण्याची माझी मनापासून इच्छा आहे.