शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2023
Written By
Last Modified: सोमवार, 22 मे 2023 (14:38 IST)

इंडियन प्रीमियर लीग 2023 : आरसीबीच्या पराभवानंतर आरसीबीच्या फॅन्स कडून शुभमन गिल आणि त्याच्या बहिणीला सोशल मीडियावर शिवीगाळ

IPL 2023 : IPL 2023 मध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणारा गुजरात टायटन्सचा स्टार फलंदाज शुभमन गिल याने रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) विरुद्धच्या सामन्यात आणखी एक शानदार शतक झळकावले आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. गुजरातच्या या विजयाने आरसीबीच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा अपूर्ण राहिल्या  आणि फाफ डू प्लेसिसचा संघ स्पर्धेतून बाहेर फेकला गेला. यानंतर स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यात संघर्ष करणाऱ्या रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे.
 
आरसीबीविरुद्धच्या सामन्यात 198 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गिलने 52 चेंडूंत पाच चौकार आणि आठ षटकारांच्या मदतीने नाबाद 104 धावांची खेळी केली. गुजरातसाठी याहंगामातील आतापर्यंतची सर्वात मोठी धावसंख्या उभारल्यानंतर गिलचे इंटरनेटवर चाहते, तज्ञ आणि क्रिकेटपटूंकडून खूप कौतुक होत आहे. दुसरीकडे, आरसीबीच्या पराभवामुळे संतप्त झालेल्या चाहत्यांनी गिलवर निशाणा साधला आहे.
 
बंगळुरू संघाच्या चाहत्यांच्या एका गटाने गिलला सोशल मीडियावर शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर या चाहत्यांनी इंस्टाग्रामवर शुभमनची बहीण शहनील हिलाही शिवीगाळ केली.
 
Edited by - Priya Dixit