सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2024
Written By
Last Modified: सोमवार, 1 एप्रिल 2024 (09:42 IST)

DC vs CSK:दिल्ली कॅपिटल्सने चैन्नई वर 20 धावांनी विजय मिळवला

DC vs CSK
आयपीएलच्या 13व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने 20 धावांनी विजय मिळवत चेन्नईची विजयी घोडदौड थांबवली. या सामन्यात डेव्हिड वॉर्नर आणि ऋषभ पंत यांच्या अर्धशतकांच्या जोरावर दिल्लीने 20 षटकात 5 गडी गमावून 191 धावा केल्या. प्रत्युत्तरात चेन्नईला 20 षटकांत 6 गडी गमावून केवळ 171 धावा करता आल्या. चेन्नईच्या या पराभवाने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर ढकलले तर दिल्ली कॅपिटल्स पहिल्या विजयासह सातव्या स्थानावर आहे. 
 
चेन्नईची 192 धावांच्या आव्हानाची सुरुवात डळमळीत झाली. संघाचे दोन्ही सलामीवीर सात धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले. ऋतुराज गायकवाडला एक धाव तर रचिन रवींद्रला दोन धावा करता आल्या. खलील अहमदने या दोघांनाही आपले बळी बनवले. यानंतर अजिंक्य रहाणे आणि डॅरिल मिशेल यांनी तिसऱ्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी केली. मात्र, 11व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर अक्षर पटेलने मिशेलला बाद केले. तो 34 धावा करू शकला. शिवम दुबे पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. संघाला चौथा धक्का अजिंक्य रहाणेच्या रूपाने बसला जो 45 धावा करून परतला. यादरम्यान त्याच्या बॅटमधून पाच चौकार आणि दोन षटकार आले.
 
महेंद्रसिंग धोनी आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने 16 चेंडूंचा सामना करत 37 धावांची तुफानी खेळी खेळली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून चार चौकार आणि तीन षटकार आले. मात्र, तो आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. चेन्नईकडून रवींद्र जडेजानेही 21 धावांची नाबाद खेळी खेळली. धोनी आणि जेडजा यांच्यात 51 धावांची नाबाद भागीदारी झाली, पण ते संघाला विजयापर्यंत नेऊ शकले नाहीत.

Edited By- Priya Dixit