शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2024
Written By
Last Modified: बुधवार, 8 मे 2024 (16:00 IST)

LSG Vs SRH : हैदराबाद आणि लखनौमध्ये प्लेऑफसाठी जोरदार लढत

LSG Vs SRH
IPL 2024 च्या 57 व्या सामन्यात बुधवारी सनरायझर्स हैदराबादचा सामना लखनौ सुपर जायंट्सशी होईल. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होणार. दोन्ही संघाना त्यांच्या मागील सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. 

17व्या हंगामात दोन्ही संघांनी आतापर्यंत 11-11 सामने खेळले असून 6-6 असा विजय मिळवला आहे..आज दोन्ही संघात प्लेऑफसाठी जोरदार लढत पाहायला मिळणार आहे. 

सनरायझर्स हैदराबादने गेल्या सामन्यात मयंक अग्रवालला प्लेइंग 11 मध्ये स्थान दिले होते. मात्र, मयंक अग्रवाल केवळ 5 धावा करू शकला. या वेळी मयंकच्या जागी राहुल त्रिपाठीला खेळण्याची संधी मिळू शकते. 
लखनौ च्या संघात आज काही बदल होऊ शकतात. ॲश्टन टर्नरच्या जागी क्विंटन डी कॉकला संधी मिळू शकते. याशिवाय अर्शीन कुलकर्णीच्या जागी कृष्णप्पा गौतमचा प्रभावशाली खेळाडू म्हणून वापर केला जाऊ शकतो. गेल्या सामन्यात दुखापतग्रस्त मोहसीन खानची जागा युधवीर सिंग घेऊ शकतो.
 
दोन्ही संघांमधील आकडेवारी पाहिल्यास, लखनौ सुपर जायंट्सचा वरचा हात आहे. SRH आणि LSG यांच्यात आतापर्यंत 3 वेळा सामना झाला असून लखनौने सर्व सामने जिंकले आहेत. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील संघाने प्रथम फलंदाजी करताना 1 आणि लक्ष्याचा पाठलाग करताना 2 सामना जिंकला आहे. SRH ने त्यांच्या घरच्या मैदानावर राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर 55 सामने खेळले आहेत आणि 34 जिंकले आहेत. 21 मध्येही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. लखनौने हैदराबादच्या मैदानावर 1 सामना खेळला आणि तोही जिंकला. 
 
संभाव्य प्लेइंग 11 जाणून घ्या 
सनरायझर्स हैदराबादः अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, राहुल त्रिपाठी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जॅनसेन, पॅट कमिन्स (क), भुवनेश्वर कुमार, टी नटराजन.
प्रभावशाली खेळाडू: मयंक मार्कंडे/जयदेव उनाडकट
 
लखनौ सुपर जायंट्स: केएल राहुल (कर्णधार आणि विकेटकीपर), क्विंटन डी कॉक, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, युद्धवीर सिंग , यश ठाकूर.
प्रभावशाली खेळाडू: कृष्णप्पा गौतम

Edited By- Priya Dixit