शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

एअरटेलचा स्मार्टफोन, फक्त 1399 रुपयांमध्ये

airtel offer

एअरटेलनेही 1399 रुपयांमध्ये स्मार्टफोन आणला आहे. शुक्रवारपासून हा फोन ऑफलाईन विक्रीसाठी उपलब्ध होईल. जिओ फोनप्रमाणेच हा फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठीही आकर्षक कॅशबॅक ऑफर्स आणि डेटा ऑफर्स देण्यात आल्या आहेत. 

फोन खरेदी केल्यानंतर ग्राहकांना 169 रुपयांचा रिचार्ज करावा लागेल. हा रिचार्ज केल्यानंतर 28 दिवसांसाठी दररोज 512MB डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळेल. तर फोन खरेदी करण्यासाठी पहिल्यांदा 2899 रुपये मोजावे लागतील. त्यानंतर सलग 36 महिने 169 रुपयांचा रिचार्ज करावा लागेल. स्मार्टफोन खेरदीच्या 18 महिन्यांनंतर ग्राहकांना 500 रुपये कॅशबॅक मिळेल. तर 36 महिन्यांनंतर उर्वरित 1 हजार रुपये कॅशबॅक दिला जाईल. असा मिळून 1500 रुपये कॅशबॅक दिल्यानंतर हा फोन केवळ 1399 रुपयात मिळणार आहे.