सोमवार, 2 फेब्रुवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 14 जून 2017 (12:08 IST)

करदात्यांना आयकर भरण्यासाठी यूझर फ्रेण्डली अॅप

all india itr

सामान्य करदात्यांना आयकर भरणं अधिक सोपं व्हावं यासाठी ‘ऑल इंडिया आयटीआर’ या सरकारी ई-फायलिंग वेबसाईटने आयकर भरण्यासाठी अॅप विकसित केले आहे.आयटीआरचं हे मोबाईल अॅप यूझर फ्रेण्डली आहे. आयकर भरण्यासोबतच रिफंड स्टेटस, एचआरएमधील सूट इत्यादी सुविधाही या अॅपच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे करदात्यांना करासंदर्भात अनेक प्रश्न किंवा शंका असतात. अशा प्रश्नांचं निरसन करण्यासाठीही विशेष सुविधा यात असेल. हे अॅप गूगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवर मोफत उपलब्ध करुन देण्यात आले आहे. 

अखिल भारतीय आयटीआरचे संस्थापक आणि संचालक विकास दहिया यांच्या माहितीनुसार, “आयकर फायलिंग करण्याची प्रक्रिया अधिक वेगवान होण्यासाठी आणि स्वत:च आपलं आयकर भरता यावं, यासाठी मोबाईल अॅप विकसित करण्यात आलं आहे. या अॅपमुळे आयकर भरण्यासाठी यातील तज्ज्ञांची मदत घेण्याची गरज भासणार नाही आणि त्यासाठी पैसेही खर्च करावे लागणार नाही.”