शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 8 मे 2017 (12:17 IST)

आता अॅमेझॉनवर विकतायेतील गोवऱ्या

‘एपीईआई ऑर्गेनिक फूड्स’नावाची कंपनी राजस्थानमधल्या कोटा इथे राहणाऱ्या तीन मित्रांनी स्थापन केली.
 
या तिघांची डेअरी देखील आहे. पण नेहमीपेक्षा त्यांना काहीतरी वेगळे करायचे या विचाराने तिघांनी शेणापासून तयार होणाऱ्या गोवऱ्या ऑनलाइन विकायच्या ठरवल्या.
 
गगनदीप सिंह, अमनप्रीत सिंह आणि उत्तमजोत सिंह या तिघा व्यावसायिकांनी मिळून गोवऱ्या विकण्याची ही कल्पना लढवली आहे.
 
‘आपण गेल्या तीन महिन्यांपासून गोवऱ्यांची ऑनलाइन विक्री करत आहोत आणि त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळत असल्याचे अनमप्रीत सिंह यांनी सांगितले. १२० रुपये प्रतिडझन प्रमाणे या गोवऱ्या विक्रीसाठी उपलब्ध आहे. गेल्या ती महिन्यांपासून त्यांनी १ हजारांहून अधिक गोवऱ्यांची विक्री केली असल्याचेही अनप्रीत यांनी सांगितले. विशेष म्हणजे मुंबई, पुणे आणि दिल्लीतून या गोवऱ्यांना मोठी मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले.