शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 22 नोव्हेंबर 2021 (23:19 IST)

सावधान! Amazon कडे आहे तुमची सर्व Secret माहिती

ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon लोकांना खूप आवडते आणि बहुतेक लोक येथून ऑनलाइन शॉपिंग करतात. पण तुम्हाला माहित आहे का की Amazon वर तुमचा बराचसा खाजगी डेटा आहे. अलीकडेच असे समोर आले आहे की अॅमेझॉन आपल्या वापरकर्त्यांचा भरपूर डेटा सेव्ह ठेवते. त्याबद्दल अधिक जाणून घेऊया..
 
अॅमेझॉनशी संबंधित हा खुलासा आश्चर्यचकित करेल 
अलीकडेच, अमेरिकेतील व्हर्जिनिया येथील खासदार इब्राहिम समीरा यांना हे समजले आहे की अॅमेझॉन त्यांची खाजगी माहिती संग्रहित करते आणि त्यांच्या संपर्कांपासून ते त्यांच्या दैनंदिन कामांपर्यंत सर्व काही अॅमेझॉनकडे आहे. याच कारणामुळे समीराने याप्रकरणी अॅमेझॉनला विरोधही केला आहे. 
 
तुमची ही माहिती Amazonकडे आहे 
समीराने अॅमेझॉनला विचारले की अॅमेझॉनकडे तिच्याकडे कोणती माहिती आहे आणि तिच्यासोबत रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या सात पत्रकारांनीही त्यांची माहिती विचारली. या सर्वांवरून असे दिसून आले की आपला डेटा अलेक्सा तसेच किंडल सारख्या विविध उपकरणांमधून गोळा केला जात आहे. तुम्ही कोणाला कधी भेटता, कोणती गाणी ऐकता, कोणते चित्रपट पाहता, तुम्हाला काय आवडते आणि काय आवडत नाही, हे सर्व Amazon कडे आहे. 
 
ऍमेझॉन हे का करते? 
जेव्हा अॅमेझॉनला विचारण्यात आले की ते त्यांच्या ग्राहकांची वैयक्तिक माहिती संग्रहित का ठेवतात, तेव्हा त्यांनी सांगितले की ते असे करतात जेणेकरून ते त्यांच्या वापरकर्त्यांना चांगली सेवा देऊ शकतील. Amazon च्या मते, अशी माहिती पूर्णपणे सुरक्षित ठेवली जाते आणि वापरकर्त्यांचा डेटा पूर्णपणे सुरक्षित असतो.