शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 16 एप्रिल 2019 (12:05 IST)

एअरटेलने सुरू केले 'माय सर्कल अॅप' संकटात महिलांना करेल मदत

दूरसंचार कंपनी भारती एअरटेलने फिक्की लेडीज ऑर्गनायझेशनसह मिळून स्त्रियांच्या मदतीसाठी रविवारी 'माय सर्कल अॅप' लॉन्च केले आहे. हा अॅप एअरटेल व्यतिरिक्त इतर दूरसंचार कंपन्यांचे ग्राहक देखील वापरू शकतात.
 
कंपनीने एका वक्तव्यात म्हटले आहे की 'माय सर्कल अॅप'च्या मदतीने महिला त्यांच्या कुटुंबातील पाच सदस्य किंवा मित्रांना इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलगू, मल्ल्याळम, कन्नड, मराठी, पंजाबी, बंगाली, उर्दू, आसामी, उडीया आणि गुजरातीसह 13 भाषांमध्ये आपत्कालीन संदेश (एसओएस) पाठवू शकतात.
 
हा अॅप अँड्रॉइड प्ले स्टोअर आणि ऍपल प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध आहे.