शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Updated :नवी दिल्ली , शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020 (15:15 IST)

Breaking: Googleने गूगल प्ले स्टोअर वरून Paytm काढले, App काढण्यामागील कारण स्पष्ट केले

शुक्रवारी गूगलने Google Play स्टोअर वरून पेटीएम एप काढला. यावर गूगलने असे म्हटले आहे की ते कोणत्याही जुगार (गेमिंग) एपाला समर्थन देणार नाहीत. पेटीएम आणि यूपीआय One97 Communication Ltd. द्वारा विकसित करण्यात आला आहे. Google Play Storeवर हा अॅप शोधताना दिसत नाही. तथापि, आधीपासूनच अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये स्थापित केलेला अॅप कार्यरत आहे.
 
पेटीएम पेमेंट एप व्यतिरिक्त कंपनीचे इतर अ‍ॅप्स- Paytm for business, Paytm money, Paytm mall इत्यादी अद्याप गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. तथापि, गूगल प्ले स्टोअरमधून हे अ‍ॅप हटविण्याबाबत पेटीएम कडून कोणतेही विधान झालेले नाही.
 
गूगलचे उपाध्यक्ष सुझान फ्रे यांनी लिहिले आहे की आम्ही ऑनलाईन कॅसिनोला परवानगी देत ​​नाही किंवा क्रीडा सट्टेबाजीची ऑफर देणार्‍या कोणत्याही अनियमित जुगार अ‍ॅप्सना मान्यता देत नाही.