बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: रविवार, 10 ऑक्टोबर 2021 (17:02 IST)

BMW 12 ऑक्टोबर रोजी भारतात आपली पहिली स्कूटर लाँच करणार आहे, ज्याची किंमत हॅचबॅक कार एवढी असेल

जर्मन ऑटोमोबाईल उत्पादक बीएमडब्ल्यू मोटरराड इंडिया आपल्या आगामी स्कूटरबद्दल काही काळापासून चर्चेत आहे. आता कंपनीने एक टीझर रिलीज करून उत्सुकता वाढवली आहे आणि ही स्कूटर भारतात 12 ऑक्टोबर म्हणजेच मंगळवारी लाँच केली जाईल. या स्कूटरबद्दल अनेक प्रकारचे लिक्स आणि टीझर्स समोर आले आहेत, ज्यात स्कूटरची वैशिष्ट्ये नमूद करण्यात आली आहेत, परंतु कंपनीकडून अद्याप फारशी माहिती शेअर करण्यात आलेली नाही.
 
कंपनीने अधिकृत खात्यातून याची पुष्टी केली आहे. BMW maxi scooter C400GT भारतात 12 ऑक्टोबर रोजी लॉन्च होईल आणि त्यानंतर त्याची विक्री सुरू होईल. ही भारतातील सर्वात प्रीमियम श्रेणी आणि किंमतीची स्कूटर असू शकते. वास्तविक त्याची किंमत सुमारे 5 लाख रुपये एक्स-शोरूम असेल, तर कंपनीने 1 लाख रुपयांसाठी प्री-बुकिंग सुरू केली आहे.एवढ्या किमतीत तर भारतात 5 लाख रुपयांची हॅचबॅक कार खरेदी केली जाऊ शकते.
 
 बीएमडब्ल्यूची ही स्कूटर सुझुकी बर्गमन स्ट्रीट 125 आणि एप्रिलिया एसएक्सआर 160 नावाच्या स्कूटरच्या सेगमेंटमध्ये लाँच केली जाईल, जिथे सुझुकीच्या या स्कूटरची किंमत 1 लाख रुपयांपेक्षा कमी आहे,आणि त्याचे मायलेज 35 किमी आहे.
 
BMW मॅक्सी स्कूटर C400GT इंजिन
BMW मॅक्सी स्कूटर C400GT स्कूटरमध्ये एक मजबूत इंजिन सेटअप दिले जाईल. यात 350 सीसी इंजिन मिळेल, जे सिंगल सिलेंडर आणि लिक्विड कूल्ड इंजिन वापरू शकते. ही स्कूटर CVT ट्रान्समिशनसह येईल. ही माहिती कंपनीच्या BMW मॅक्सी स्कूटर C400GT ग्लोबल व्हेरियंट मध्ये उपलब्ध आहे.
 
BMW मॅक्सी स्कूटर C400GT ची शक्ती
ही आगामी बीएमडब्ल्यू स्कूटर 7500 आरपीएमवर 35 बीएचपी पॉवर निर्माण करण्यास सक्षम असेल, तर 5750 आरपीएमवर 26 एनएम टॉर्क जनरेट उत्पन्न करेल. कंपनीचा दावा आहे की ही स्कूटर 140 किलोमीटर प्रतितासाची टॉप स्पीड गाठू शकते.
 
BMW मॅक्सी स्कूटर C400GT ची वैशिष्ट्ये
जागतिक बाजारपेठेत, BMW maxi scooter च्या पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक फॉर्क्स  आणि मागील बाजूस ड्युअल स्प्रिंग शॉक ऑब्जर्वबर मिळतात, जे लोकांना ब्रेकर आणि खड्ड्यांपासून वाचवतात. या स्कूटरच्या समोर एक ड्युअल डिस्क ब्रेक आहे आणि मागच्या पॅनलवर सिंगल डिस्क ब्रेक आहे, जो ABS सह येतो.
 
BMW मॅक्सी स्कूटर C400GT ची इतर वैशिष्ट्ये
यात राईड-बाय-वायर थ्रॉटल, ट्रॅक्शन कंट्रोल आणि राईडिंग मोड सारख्या अनेक वैशिष्ट्यांचा समावेश असेल. स्कूटरला उंच विंडस्क्रीन, पुल-बॅक हँडलबार, मोठी स्टेप्ड सीट, ड्युअल फूटरेस्ट, फुल-एलईडी लाइटिंग, कीलेस इग्निशन, हीटेड ग्रिप्स, हीटेड सीट, अँटी-थेफ्ट अलार्म सिस्टम आणि ब्लूटूथ-इनेबल्ड इन्स्ट्रुमेंट क्लस्टर समाविष्ट आहे.